अल्पभूधारक शेतकऱ्याने नैराश्येतून घेतला टोकाचा निर्णय !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सततची नापिकीमुळे आर्थीक अडचणीत सापडलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने विषारी औषध सेवन केले होते. पाचोरा येथील खासगी रूग्णालयात उपचार घेत असतांना अखेर प्राणज्योत मालविली.

पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथील रविंद्र ओंकार चव्हाण (वय-४४) या शेतकऱ्यांने सततच्या नापिकीमुळे आर्थिक अडचणीत सापडल्याने शनिवार ८ एप्रिल रोजी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ही बाब लक्षात येताच त्याच्या घरच्यांनी त्याला ग्रामस्थांच्या मदतीला पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान १० एप्रिल २०२३ रोजी रविंद्र चव्हाण यांचे दुःखद निधन झाले. रविंद्र ओंकार चव्हाण हा तारखेडा येथील रहिवासी असून थोडीशी शेतजमीन शेतजमीन राबराब राबुनही निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीमालाला उत्पन्नात आलेली घट व आलेल्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने आधीच आर्थिक परिस्थिती बेताची त्यातच त्याला एक १८ वर्षे वयाची लग्नासारखी मुलगी असल्याने तिच्या लग्नाची चिंता तसेच एक मुलगा शिक्षण घेत असून त्याला शिक्षणासाठी लागणारा खर्च व दैनंदिन जीवनात लागणारा खर्च करणे अवघड झाले होते याच विवंचनेत रविंद्र चव्हाण याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत आहे. मयत रविंद्र चव्हाण याच्यामागे एक मुलगा एक मुलगी आई, वडील असा परिवार आहे.

Protected Content