डॉ. भूषण मगर यांचा कोविड सेवेबद्दल गौरव

पाचोरा प्रतिनिधी । येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलमधील अविरत कोरोनाग्रस्तांच्या रूग्णसेवेबद्दल या हॉस्पीटलचे संचालक डॉ. भूषण मगर यांना शासनातर्फे आभारपत्र देऊन गौरविण्यात आले.

येथील विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे संपूर्ण राज्यात उपचारासाठी सुप्रसिद्ध आहे. या हॉस्पिटलमध्ये शासकीय आरोग्य योजनेतून संपूर्णपणे मोफत मोठमोठ्या ऑपरेशन शस्त्रक्रिया विविध आजारावर उपचार केला जात आहे. तसेच कोरोना सारख्या भयंकर महामारीच्या संकटात सुद्धा डॉ. भूषण मगर व डॉ. सागर गरुड आणि विघ्नहर्ता हॉस्पिटलची सर्व टीम अतिशय यशस्वी पणे काम करत आहे. विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे गोरगरीबाचा आधार ठरत आहे. कॉरोनाच्या रुग्णावर रात्रंदिवस सर्वात जास्त यशस्वी उपचार डॉ. भूषण मगर यांनी स्वत: केला आहे.

याची दखल महाराष्ट्र शासनाने सुध्दा घेतली असून डॉ. भूषण मगर यांना महाराष्ट्र शासनाने महसूल विभाग तर्फे आभार पत्र उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे-पाटील, खासदार उन्मेष पाटील व आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. यावेळी शासकीय अधिकारी ग्रामसेवक तलाठी व सर्व कर्मचारी उपस्थित होते. डॉ भूषण मगर हे अहोरात्र रुग्णांची सेवा बजावत असून त्याचे जिल्हाभरात कौतुक केले जात आहे.

Protected Content