तरसोद येथील पोलीस पाटलाला मारहाण; एकावर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । लॉकडाऊन काळात आरडाओरड करून नको असे सांगणाऱ्या पोलीस पाटलाला एकाने शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना तालुक्यातील तरसोद येथे रविवारी घडली. नशिराबाद पोलीसात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोकुळ नथ्थू शिरूड (वय-५७) रा. तरसोद ता. जि.जळगाव हे  तरसोद गावाचे पोलीस पाटील आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे गावातही शांतता आहे. १८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता गावातील साहेबराव राजू पवार (वय-३०) हा गावात मोठमोठ्या आरडाओरड करत होता. त्यावेळी पोलीस पाटील गोकुळे शिरूड  यांनी त्याला आरडाओरड करू नको असे सांगितले. याचा राग आल्याने सोहबराव पवार याने पोलीस पाटील शिरूड यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रकरणी रात्री ११ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात तरूणावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे. 

Protected Content