केवायसीच्या नावाने डॉक्टराची ६० हजारात ऑनलाईन फसवणूक

जळगाव प्रतिनिधी । पेटीएमची सेवा सुरू ठेवण्यासाठी केवायसी पूर्ण करा असे सांगत एकाने डॉ. राधेश्याम चौधरी  वय ४६ रा. नंदनवन कॉलनी यांची ५९ हजार ८७४ हजार रुपयात फसवणुक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवार २ ऑक्टोबर रोजी  जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .

डॉ राधेश्याम चौधरी हे ५ सप्टेंबर रोजी घरी असताना त्यांना त्यांच्या मोबाइल  क्रमांकावर एक एसएमएस आला. पेटीएमची केवायसी पूर्ण करा अथवा तुमची पेटीएम सेवा बंद होईल. त्यासाठी  ९८८३१२०१७० या क्रमांकावर संपर्क करा असे त्या संदेशात नमूद होते. त्यानुसार डॉ चौधरी यांनी संबंधित क्रमांकावर संपर्क साधला. फोनवर बोलत असलेल्या अनोळखी व्यक्तीने विचारल्यानुसार डॉ. चौधरी यांनी संपूर्ण माहिती दिली. त्यानंतर काही वेळाने डॉक्टर चौधरी यांना त्यांच्या बँकेच्या खात्यातून  ५९ हजार ८७४ रुपये काढले गेल्याचे लक्षात आले. फोनवर बोलत असलेल्या अनोळखी व्यक्तीने आपली फसवणूक केल्याची खात्री झाल्यावर डॉ. राधेश्याम चौधरी यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून शनिवार २ ऑक्टोबर रोजी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहायक फौजदार सतीश सुरळकर हे करीत आहेत

Protected Content