बोळे विकासो चेअरमनपदी सत्तर गिरासे तर व्हा.चेअरमनपदी रोहीदास पाटील बिनविरोध

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बोळे येथी विविध विकास सोसायटीच्या चेअरमनपदी सत्तर गिरासे आणि व्हा.चेअरमनपदी रोहिदास पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

विकासोच्या  चेअरमन व व्हा.चेअरमन ठरल्याप्रमाणे कार्यकाळ संपल्याने पदाचे राजीनामे दिलेले होते. त्यामुळे विकासोचे चेअरमन व व्हा.चेअरमन पद रिक्त होते. सदरील रिक्त पदांची निवडणूक नुकतीच निवडणूक अधिकारी श्रीमती सिहले यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी चेअरमन पदासाठी सत्तर लोटन गिरासे तर व्हा.चेअरमन पदासाठी रोहीदास श्रीराम पाटील यांचे एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे उपस्थित निवडणूक अधिकारी यांनी बिनविरोध निवड जाहीर केली.

या बिनविरोध निवडीबद्दल चेअरमन व व्हा.चेअरमन यांचे आमदार चिमणराव पाटील, पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, जि.प. मा.कृषि सभापती डाॕ.दिनकर पाटील, पारोळा शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील सर व विद्यमान सचिव, सदस्य यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सचिव मधुकर पाटील, सदस्य सखाराम चौधरी, मोहन गिरासे, साहेबराव गिरासे, भटेसिंग गिरासे, प्रताप गिरासे, एकनाथ जाधव, अनिल पवार, ताराचंद निकम, दिपक नावरकर, संजय गिरासे, दरबार गिरासे, पोपट गिरासे हे उपस्थित होते.

 

Protected Content