दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; १० दुचाकी हस्तगत

अमळनेर प्रतिनिधी । जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरी करणारी टोळीचा पर्दाफाश अमळनेर पोलीसांनी केला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत केल्या आहे.

 

याबाबत माहिती अशी की, अमळनेर शहरासह जिल्ह्यातील अनेक भागातून दुचाकींच्या चोरीचे प्रमाण वाढले होते. याबाबत पोलीस अधिक्षक डॉ प्रविण मुंढे यांनी गुन्ह्यातील संशयित आरोपींना शोधण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना संशयित आरोपी भुषण शांताराम पाटील रा. तांबेपूरा, अमळनेर हा दुचाकी चोरी करत असल्याची गोपनिय माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक फौजदार पूंजू कुमावत, बापू साळुंखे, पोहेकॉ सुनिल हटकर, पो.ना. मिलींद भामरे, दिलीप माळी, पो.ना. सुर्यकांत साळुंखे, रविंद्र पाटील या पथकाने संशयित आरोपी भुषण पाटील याला ताब्यात घेतले. त्याच कसून चौकशी केली असता दुचाकी चोरी करणारे इतर तीन साथिदार असल्याचे सांगितले. त्यानुसार संशयित आरोपी गजानन दिलीप ताकतोडे रा. गांधलीपूरा अमळनेर, विक्की जवाहरलाल सोनवणे रा. सानेनगर तांबेपूरा अमळनेर आणि संभाजी बाळू पाटील रा. सातरणे ता.जि. धुळे अश्यांना देखील पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. चौघांकडून चोरीच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अजून काही दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

Protected Content