हॉस्पीटलमधून फरार झालेला आरोपी अटकेत

चाळीसगाव प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील मेडिकल हॉस्पीटलमधून फरार झालेल्या आरोपीला येथील पोलीस स्थानकाच्या कर्मचार्‍यांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, जळगाव येथील शंकर रविंद्र चौधरी (२४ रा. शिव कॉलनी चाळीसगाव) हा नशिराबाद पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यात जळगाव मध्यवर्ती कारागृहात न्यायायलीन कोठडीत असतांना त्याची प्रकृती खराब झाल्याने त्यास गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल केले होते.

दरम्यान, दि २६ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास हॉस्पिटलच्या चौथ्या माळ्यावरून खिडकीची जाळी तोडून फरार झाला होता तेव्हा पासून पोलीस त्याचा शोध घेत होते. हा आरोपी चाळीसगावी असल्याची गोपनीय माहिती डीबीचे कर्मचारी भूषण पाटील व सतीश राजपूत यांना मिळाल्यावर पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी दि २९ जून रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चालीसगाव महाविद्यालयाजवळील वाय पॉइंट जवळ सापळा रचून आरोपी शंकर चौधरी यास अटक केली आहे. या कारवाईन एएसआय अनिल अहिरे, पो कॉ शैलेश पाटील, विजय पाटील, दीपक पाटील, शरद पाटील यांनी सहभाग घेतला.

Protected Content