फलक विटंबनेची चौकशी करा : ना. पाटील समर्थकांची मागणी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या स्वागत फलकाच्या विटंबनेचा शिंदे गटाचे पदाधिकारी आणि ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी निषेध केला असून या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आज जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले आहेत. यात धरणगाव येथे देखील स्वागतांचे फलक लावण्यात आले आहेत. यातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या परिसरात लावलेला एक फलक रात्री उशीरा फाडल्याचे दिसून आले. यामुळे एकच खळबळ उडाली असून रात्री उशीरा अज्ञात समाजकंटकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी याचा निषेध केला आहे.

दरम्यान, या कृत्याचा शिंदे गटानेही निषेध केला आहे. या संदर्भात उपजिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष पी. एम. पाटील यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यात म्हटले आहे की, जळगाव जिल्हा सह धरणगाव शहरात शिवसेनेचे युवा नेते आदित्यजी ठाकरे साहेब हे दिनांक वीस रोजी जिल्ह्यात येत असून धरणगाव शहरात शिव संवाद यात्रेच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ शिवसेनेने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने गुलाबराव वाघ साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्वागताची जय्यत तयारी केली असून ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहे.

काही समाजकंटकांनी बॅनर फाडल्याचे निदर्शनास आले आहे या कृत्याच्या बाळासाहेब ठाकरे शिवसेना व गुलाबराव पाटील साहेब समर्थक जाहीर निषेध करत आहेत. ज्या कोणी अज्ञातांनी हे कृत्य केले असेल त्याच्या धरणगाव पोलिसांनी शोध घ्यावा. जो कोणी दोषी आढळेल त्यावर योग्य ती कारवाई करावी. यासंदर्भात आम्ही स्वतः धरणगाव पोलीस निरीक्षक भेट घेणार आहोत या कृत्याच्या आम्ही जाहीर निषेध करतो असे पी. एम. पाटील यांनी नमूद केले आहे.

Protected Content