धक्कादायक : मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार

मुंबई प्रतिनिधी । राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी आपले शारिरीक शोषण केले असल्याची तक्रार एका तरूणीने केली असून तिने याबाबत पंतप्रधानांसह मान्यवरांना ट्विटवर टॅग करून आपल्याला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात एका तरूणीने बलात्काराची तक्रार केली असून यावरून भाजपने अतिशय आक्रमक पवित्रा घेतला आहे. आता याच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचेच नेते तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरूध्द एका तरूणीने शारीरीक अत्याचार केल्याची तक्रार केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

एका तरूणीने ओशिवरा पोलीस स्थानकात धनंजय मुंडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यात धनंजय मुंडे यांनी आपले २००६ पासून शारिरीक शोषण केली असून याचे चित्रीकरण केल्याचा आरोप केला आहे. या एफआयआयरसह ट्विट करतांना तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे आदी नेत्यांनाही टॅग केले आहे.

Protected Content