शेतमजुराची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या

 यावल : प्रतिनिधी ।  तालुक्यातील न्हावी येथे शेतातील विहीरीत उडी घेवुन एका आदीवासी शेतमजुराची आत्मह्त्या केली आहे पोलीसात अकस्मात  मृत्युची नोंद करण्यात आली आहे . 

  फैजपुर पोलीसान्नि दिलेल्या   माहीतीनुसार न्हावी येथील प्रगतीशील शेतकरी टेनु बोरोले यांच्या न्हावी शिवारातील शेतात काल १५ मार्चरोजी रात्री ११, ३० वाजेच्या सुमारास त्याच शेतात कामास असलेले प्यारसिंग रेमसिंग बारेला ( वय ४५ , वर्ष रा – माळीवाडा , न्हावी )  यांनी विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . प्यारसिंग बारेला याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी केले  फैजपुर पोलीस स्टेशनला अकामात मृत्युची नोंद करण्यात आली  तपास स पो नि प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे   प्यारसिंग बारेला यांच्या पश्चात  पत्नी , दोन विवाहीत मुली  आणी एक मुलगा आहे .

Protected Content