जळगावात लुईस ब्रेल जयंती साजरी

WhatsApp Image 2020 01 04 at 6.25.37 PM

जळगाव, प्रतिनिधी | समवेशीत शिक्षा समग्र शिक्षण , म.न.पा शिक्षण मंडळ जळगाव येथे लुईस ब्रेल जयंती साजरी करण्यात आली. यावेळी लुईस ब्रेल यांच्या कार्याची माहिती देण्यात आली.

४ जानेवारी १८०९ रोजी फ्रान्समध्ये लुईस ब्रेल यांचा जन्म झाला. वयाच्या तिसऱ्या वर्षी अपघाताने त्यांना अंधत्व आले. पण त्यावर मात करून त्यांनी उच्च शिक्षण प्राप्त केले. शिक्षणामध्ये येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन उठावदार सहा थिम्बानवर आधारित स्पर्शाने वाचता येणारी लिपी शोधून काढली. जिचा उपयोग आज ही अंध व्यक्ती करतात व ती ब्रेल लिपी म्हणून प्रसिध्द आहे. अशा थोर शास्त्रज्ञास अभिवादन करण्याकरिता प्रमुख अतिथि म्हणून प्रदेश सचिव महाराष्ट्र मनियार बिरादरीचे डॉ. अल्तमश शेख, सुनील सरोदे, वसीम शेख, विशाखा जोशी, शादी कोडी, समाधान माळी , सूरज सडुण्के, धनराज पाटील हे उपस्थित होते.
याप्रसंगी लुईस ब्रेल यांचा विषयी माहिती देण्यात आली.

Protected Content