मुस्लिम मंचच्या लाक्षणिक उपोषणात तरुणाई ने हात बांधून केला निषेध

WhatsApp Image 2020 01 04 at 4.58.01 PM 1

जळगाव, प्रतिनिधी | मुस्लिम मंच द्वारा जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नागरिकत्व कायद्याला विरोध व एनआरसीला विरोध म्हणून लाक्षणिक उपोषण सुरू असून शनिवारी या उपोषणाचा तेरावा दिवस होता. या दिवशी अंजुमन मुस्लिम शाह व अंजुमन खिदमत खल्क, जळगाव व शाहूनगर युवक बिरादरी ने सक्रिय सहभाग नोंदवून उपोषण द्वारे आंदोलन केले. या आंदोलनाचे वैशिष्ट्य म्हणजे तरुणाईने आपले दोघी हात बांधून भाजप सरकारचा निषेध नोंदविला.

आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करीत असून कोणत्याही प्रकारचा शांततेचा भंग करणार नाही व आमचे अल्पसंख्यांक बांधव कधीही शांतता भंग करीत नसल्याचे प्रतीक म्हणून त्यांनी पूर्ण तीन तास आपले दोघी हात बांधून साखळी तयार केली होती. शासनाला निदर्शनास आणले की, आपण काहीही केले तरी आम्ही गांधीच्या मार्गाने आंदोलन करू.  डॉ. अमानुल्ला शाह, मुस्ताक करिमी, मुस्ताक भिस्ती, शेख हसन, नुसरत गौर, इरफान नूरी, उमेरा मुजफ्फर खान ,कासिम शेख, आदिल शाह, मजिद झकेरिया, फैजान जुबेर, रागिब जागीरदार, करीम सालार, डॉ. जबी शाह, रफिक शा, इमरान सिकलिगर, अलफ़ैज़ पटेल यांची भाषणे झाली.

यांनी दिले निवेदन

हाजी आमद शाह यांच्या नेतृत्वात मुस्ताक शा, अकील शाह, मजींद जकेरिया, शेख हसन, डॉ. अमानुल्ला शहा, शकीला खाटीक यांनी निवेदन दिले.यावेळी महमूद शेख अध्यक्ष आयडियल रईस बाबा बागवान, एजाज अहमद, साजिद शेख ,हाजी अहमद शाह ,डॉ. एजाज शाह, डॉ. शरीफ शाह, अकील शाह, शेख हसन, डॉ. जबी शाह, खालील बागवान, शकील शेख, रफीक मोहम्मद, वसीम शेख, सलीम बशीर शाह, मेहमूद शहा, शेख भैय्या, रफिक शेख, जमीला हमीद, नादिया आफरीन, नसरीन कादरी, तहमीना फरीद, रजिया सय्यद, रिजवाना सय्यद, समीना परविन, अस्मा शेख, सम्रीन कलीम खान, रुबीना बानो, इम्रान खान ,मुजाहिद शेख, सायमा शेख, हुमेरा रहीम, अल्फिया फारुख, इकबाल अल्फिया, असिफ़ा शेख, शबनम , समीरा, मुस्कान खान, तहसीन मोहम्मद, शर्मिन, सानिया एकबाल, यास्मीन इस्माईल, निदा बासीत खान आदींची उपस्थिती होती
.

Protected Content