दोन दिवसात संसर्गबाधितांच्या संख्येत वाढ !

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – देशासह राज्यात गेल्या दोन दिवसात पुन्हा संसर्गबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे काहीशी शंका उपस्थित केली जात आहे. घाबरण्याचं कारण नाही, राज्यात परिस्थितीवर लक्ष असून योग्य वेळी निर्णय घेतला जाईल, असे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांनी प्रसिद्धी माध्यमाशी बोलतांना सांगितले.

राज्यात आणि देशभरात कोरोना संसर्गबाधितांची संख्या घटली असून राज्यातील बहुताश जिल्हे संसर्गमुक्त देखील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारतर्फे २ एप्रिल गुढी पाडव्यापासून सर्व निर्बंध हटवले आहेत. राज्यातील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच गेल्या दोन दिवसांत पुन्हा रुग्णसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर चिंता तसेच चौथी लाट असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लसीकरण वाढविण्याचे आवाहन

गेल्या दोन दिवसात राज्यात १३७ तर मुंबईतच ८५ रुग्ण असून देशभरात १२४७ संसर्गबाधित रुग्ण आढळून आले आहेत. केंद्राकडून सतर्कतेचा इशारा असला तरी काही राज्यांचा त्यात उल्लेख आहे. राज्याने ६० हजार केसेस रोज पाहिल्या असून सध्यस्थिती नियंत्रित आहे. राज्यात लसीकरणाचे प्रमाण देखील चांगले आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. राज्यात १२ ते १८ वयोगटातल्या मुलांच्या लसीकरणाला प्रोत्साहनासह जनजागृती केली जात आहे. लसीकरण स्वत:च्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. बूस्टर डोससंदर्भात केंद्र सरकारने निर्देश दिले असून नागरिकांनी खासगी केंद्रात शुल्क देऊन बूस्टर डोस घ्यायला हरकत नाही. मात्र ज्याचे लसीकरण राहिले आहे त्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे.

गर्दीत जातांना जेष्ठांनी मास्क वापरा
राज्य सरकारने मास्कची सक्ती हटवली आहे. परन्तु ज्येष्ठ नागरिक किंवा सहव्याधी असणाऱ्या व्यक्तींनी गर्दीत मास्क वापरण्याची काळजी घ्यावी. तसेच दैनदिन प्रवास आवश्यक असणाऱ्यांनी देखील मास्क वापर करणे गरजेचे आहे. राज्यात तसेच काही प्रमाणात दिल्लीतही रुग्ण वाढत आहेत, तर त्या पद्धतीने आयसीएमआर, केंद्र सरकार, राज्याचा टास्क फोर्स, आरोग्य विभाग या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत. तशी परिस्थिती जर जाणवली, तर आवश्यक वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही आरोग्यमंत्री ना. टोपे यांनी म्हटले आहे.

Protected Content