फैजपूरात ऑन रोड २२३ जणांची ॲंटीजन टेस्ट ; ९ पॉझिटिव्ह

फैजपूर प्रतिनिधी । शहरात कडक लॉकडाऊन सुरू असतांना विना कारण रस्त्यावर फिरणाऱ्या रिकाम टेकड्यांची ऑन रोड अँटीजन टेस्टची ‘मात्रा’ देण्यात आली. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, सुभाष चौकात राबवण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल २२३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. मात्र, नऊ जणांना बादा असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे शहरात विनाकारण फिरणाऱ्यांना धडकी भरली आहे.

राज्यात मंगळवारी रात्रीपासून कडक लाॅकडाऊन सुरू झाला आहे त्यामुळे बुधवारी सकाळी सात ते अकरा या वेळेत ठराविक व अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरू झाली होती दुपारी अकरा वाजे नंतर पोलिस व पालिका प्रशासनाने मुख्य  सुभाष चौक, व्यापारी संकुले आदी मधील दुकाने बंद केली त्यानंतर डीवायएसपी नरेंद्र पिंगळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, सपोनि प्रकाश वानखडे, फौजदार रोहिदास ठोंबरे, कर निरीक्षक बाजीराव नवले, अभियंता फारुकी व वैद्यकीय अधिकारी समीर शेख डॉक्टर महाजन व त्यांच्या पथकाने सुभाष चौकात ठाण मांडून विनाकारण शहरात करणाऱ्या नागरिकांवर अँटीजन टेस्टची ‘मात्र’ सुरू केली त्यामध्ये तब्बल २२३ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली या तपासणीमध्ये शहरातील ६ व रावेर तालुक्यातील३ अशा नऊ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले त्यांना तातडीने औषध उपचारासाठी रवाना करण्यात आले दरम्यान या कारवाईने विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांमध्ये धडकी भरली आहे.  तर काही दुकानदार अद्यापही कोरोना  संकटाचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

 

 

 

Protected Content