“नागार्जुन आणि आचार्य भारद्वाज” या आंतरराष्ट्रीय पुरस्काराचे नागपुरात शानदार वितरण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिंदू रिसर्च फाउंडेशनतर्फे नागार्जुन पुरस्कार दिला जातो. या वर्षीचा पुरस्कार जगातील 45 विद्यापीठांनी पीएचडी केलेल्या जगप्रसिद्ध शास्त्रज्ञांना दिला जात असून पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांना पुरस्काराने गौरविण्यात आले.

महर्षि वाल्मिक यांच्या जयंती दिनी इसवी सन पूर्व काळात अनेक भारतीय ऋषीमुनींनी विविध क्षेत्रात सखोल संशोधनात्मक लिखाण करून त्या काळात वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला आणि त्यांनी केलेल्या लिखाणाचा व संशोधनाचा आधार घेऊनच आज जगभर वैज्ञानिक प्रगती झालेली आहे. त्यातीलच एक म्हणजे ऋषी नागार्जुन ज्यांनी इसवी सन पूर्व काळात रसायनशास्त्रावर सखोल संशोधन करून लिखाण केलेले आहे. त्यामुळे जागतिक स्तरावर त्यांची नोंद घेतलेली आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांच्या नावाने हिंदू रिसर्च फाउंडेशनच्या वतीने नागार्जुन पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ ज्यांना जगातील 45 विद्यापीठांनी पीएचडी प्रदान केलेल्या आहेत. अशा पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकरांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

हा सन्मान भारताचे संशोधनवृत्तीचे ज्येष्ठ मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते देण्यात आला. दुसरा पुरस्कार आचार्य भारद्वाज यांच्या नावाने ज्यांनी अनेक संशोधनात्मक लिखाण हजारो वर्षांपूर्वी केलेले आहे. आचार्य भारद्वाज यांच्या नावाने भारताचं जे यान मंगळावर गेला त्या यानाच्या इंजिनाची संकल्पना संशोधन आणि जनकअसलेले जगप्रसिद्ध संशोधक इस्त्रोचे माजी प्रमुख पद्मभूषण एस नंबीनारायण यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ज्यांनी जगभरातील 130 देशातील हिंदू बांधवांचे संघटन उभे केलेला आहे असे खडकपूर आयआयटीचे विद्यार्थी जागतिक हिंदू काँग्रेसचे प्रमुख स्वामी विज्ञानानंद जी यांच्या शुभहस्ते सन्मानित करण्यात आला. हे पुरस्कार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सन्माननीय व्यक्तींना देण्यात येतात आणि जगातील सर्वश्रेष्ठ अशा भारतीय संस्कृतीचे जागतिक स्तरावर संशोधन झाले पाहिजे व नोबल पुरस्काराच्या दर्जा या पुरस्कारांना मिळावा ही त्या मागची प्रामाणिक भूमिका असल्याचे या संस्थेचे प्रमुख विश्वस्त माजी पोलीस महासंचालक डॉक्टर टि. एस. भाल यांनी नमूद केले.

यावेळी नामदार नितीन गडकरी साहेबांनी आपल्या ओघवत्या शैलीत अत्यंत अभ्यासपूर्ण मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.विज्ञानानंदाजींनी प्रत्येक विद्यापीठांमध्ये हिंदू धर्माच्या संशोधनात्मक कार्य केलेल्या ऋषीमुनींच्या वैज्ञानिक संशोधनाचा अभ्यासक्रमात समावेश झाला पाहिजे. जेणेकरून इसवी सन पुर्व काळापासून भारतीयांनी वैज्ञानिक क्षेत्रात केलेल्या संशोधन जगासमोरील आले पाहिजे साठी प्रयत्न करण्याची गरज असल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी सत्कारमूर्ती डॉ.रघुनाथ माशेलकर व डॉ.श्री नंबीनारायण यांनी आपल्या मनोगतामध्ये उपस्थितांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शना सह आपले अनुभव विशद केले. नागपुर येथील कवी कुलगुरू कालीदास सभागृहात झालेल्या या शानदार सोहळ्यासाठी भारतभरातील अनेक विद्यापीठाचे कुलगुरू शास्त्रज्ञ आणि अनेक संशोधकांनी सुद्धा उपस्थिती लावली.

यावेळी या विचार पिठावर इस्त्रोचे प्रकल्प प्रमुख डॉ. एस.अरुण यांनी विशेष उपस्थिती लाभली. कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर मधुसूदन पेन्ना रेड स्वस्तिकचे अखिल भारतीय अध्यक्ष तथा लिज्जत पापडचे कार्यकारी संचालक सुरेश कोते, भगवान राऊत यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे अत्यंत अभ्यासपूर्ण प्रास्ताविक व संकल्पना या सोहळ्याचे प्रमुख आयोजक डॉ. टि. एस.भाल यांनी मांडली. खुमासदार सुत्रसंचालन प्रा.तिडवे पणजी गोवा यांनी केले. हा कार्यक्रम अत्यंत देखणा आणि यशस्वी करण्यासाठी हिंदु रिसर्च फौंडेशन मैत्री परिवार रेड स्वस्तिक परिवारच्या सर्व मान्यवरांनी परिश्रम घेतले.

Protected Content