अश्लिल व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तरूणाला पैशांची मागणी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जुने जळगाव परिसरातील एका भागातील तरुणाला अनोळखी व्यक्तींनी मोबाईल संपर्क साधून त्याचा अश्लिल व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केल्याचा प्रकार आला आहे. याप्रकरणी सोमवार, १० ऑक्टोंबर रोजी जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव शहरातील जुने जळगावातील एका भागात तरुण वास्तव्यास आहेत. त्याला एका मुलीने फेसबुकवर फ्रेन्ड रिक्वेस्ट पाठवली होती. त्यानंतर मेसेंजरद्वारे तरुणीने संबंधित तरुणाला मेसेज पाठवून व्हॉटस्ॲप क्रमांक मिळविला. त्यानंतर त्याच्या मोबाईल क्रमाकांवर ८ ऑक्टोंबर रोजी व्हॉटस् ॲप व्हिडीओ कॉल आला. यावर तरुणीने त्याला कपडे काढण्यास लावून अश्लिल व्हिडीओ तयार केला. तसेच हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करुन बदनामी करण्याची धमकी देत तरुणाला २० हजार रुपयांची मागणी केली. दोन दिवसानंतर तरुणाने सोमवारी याबाबत जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाधर कानडे हे करीत आहेत.

Protected Content