किरण बाकालेंच्या अटकेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण (व्हिडीओ)

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | एलसीबीचे निलंबीत पोलीस निरिक्षक किरण बकाले यांना अटक करून सेवेतून बडतर्फ करावे या मागणीसाठी आजपासून विविध संघटनानी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर साखळी उपोषण पुकारले आहे.

 

एलसीबीचे निलंबीत पोलीस निरिक्षक किरण बकाले यांनी मराठा समाजाला उद्देशून आक्षेपार्य विधान केले आहे. त्याच्या विरोधात मराठा समाजासह सर्व समाजांमध्ये संतापाची लाट उसळलेली आहे. या घटनेला तब्बल महिना उलटून देखील बकलेला  अटक होत नसल्याने महाराष्ट्रातील मराठा समाज व विविध समाजांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली असून पोलिसांची प्रतिमा डागळली आहे.  पोलीस अधीक्षक यांनी बकालेला अटक केली नसल्याने सर्व जाती समूहाच्या ४५ संघटनांनी आज मंगळावर दि. ११ ऑक्टोबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ केला आहे. या साखळी उपोषणात प्रतिभा शिंदे वाल्मीक पाटील निलेश पाटील, राम पवार, ग. स. सोसायटी अध्यक्ष उदय पाटील आदी विविध क्षेत्रातील व्यक्ती सहभागी झाल्या आहेत.

Protected Content