आता व्हॉट्सअप द्वारे भारतगॅस ग्राहक करू शकतील बुकींग

 

जळगाव, प्रतिनिधी । शहरात तसेच देशात लोकांना गॅस लगेच मिळावा त्या करिता अतिरिक्त सुविधा भारतगॅस ग्राहकांना उपलब्ध करण्यात आलेली आहे. आता व्हॉट्सऍप द्वारे हि बुकींग शक्य असून त्या करीता कंपनीने स्मार्टलाईन सेवा सुरु केली आहे अशी माहिती जळगाव येथील कौशिकी भारतगॅस चे संचालक सौरभ चौबे यांनी दिली.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, भारतगॅसने व्हॉट्सऍप द्वारे बुकींगसाठी 1800224344 हा स्मार्टलाईन नंबर ग्राहकांसाठी प्रसिद्ध केला आहे. हा नंबर ग्राहकांनी आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह करून तसेच व्हॉट्सऍपमध्ये जाऊन फक्त Hi टाईप करावे. बुकिंग तसेच ग्राहकांना असलेली विविध शंकेचे समाधान व्हॉट्स ऍप द्वारे केले जाईल. ही सुविधा फक्त भारतगॅस कंपनीकडे रजिस्टर असलेल्या मोबाइलवर उपलब्ध असेल. व्हॉट्सऍप द्वारे बुकींग केल्यानंतर बुकींग आयडी लगेच कस्टमरला मिळेल. तसेच ऐक लिंक त्यांना व्हॉट्सऍप होईल ज्यामुळे ग्राहकास डेबिट / क्रेडिट कार्ड किंवा अमेझॉन पे ने बिल पेमेंट करता येईल. लॉकडाऊनच्या काळात सुरक्षिततेला लक्ष्यात ठेऊन जास्तीत जास्त ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन कौशिकी भारतगॅसने केले आहे

Protected Content