विटनेर विकासोवर शिवसेनेचा भगवा

पारोळा – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील विटनेर विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक नुकतीच पार पडली असून शिवसेनेने १३ पैकी १३ जागांवर बिनविरोध विजय मिळविला आहे.

या निवडणुकीत शिवसेनेच्या जागेसाठी १३ जागेसाठी मतदान प्रक्रीया घेण्यात आली. या निवडणुकीत सेनेने दाखल केलेल्या १३ अर्जांच्या विरोधात एकही अर्ज दाखल न झाल्याचे निवडणुक निर्णय अधिकारी योगेश बाबुराव पाटील यांनी १३ च्या १३ जागा बिनविरोध विजयी झाल्याचे घोषित केले.

या विजयाने विटनेर विकासोवर शिवसेनेने १३ पैकी १३ जागांवर बिनविरोध विजय मिळवत भगवा फडकविला आहे. अध्यक्ष पदी – नंदकीशोर सांडु पाटील, उपाध्यक्ष – भारतीबाई पाटील, सदस्य – भादु पाटील, पंडीत पाटील, भगवान पाटील, प्रकाश पाटील, भाऊसाहेब पाटील, रामसिंग पाटील, रघुनाथ पाटील, गुंताबाई पाटील, जिजाबाई धनगर, हिंमत चांभार, एकनाथ माळी अशी विजयी उमेदवारांची नावे आहे. या सर्व विजयी उमेदवारांचे आमदार आबा पाटील यांनी दुरध्वनीव्दारे तर पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी सत्कार करून शुभेच्छा देत अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

तसेच हि निवडणुक योग्यरित्या हाताळणारे सचिव प्रविण साहेबराव पाटील यांचा देखिल सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पारोळा बाजार समिती उपसभापती दगडुबापु पाटील, संचालक चतुरभाऊ पाटील, सरपंच सुनिल पाटील, विलास पाटील, ईश्वर पाटील, गोपाल पाटील, दयाराम मोरे, धर्मसिंग पाटील, ईश्वर मोरे, रमेश पाटील, रविंद्र पाटील, नंदु देवरे, अशोक अहिरे, ईश्वर माळी, काशिनाथ पाटील यांचेसह आदी उपस्थित होते.

 

Protected Content