शक्तीशाली यंत्रणांशिवाय इतके रेकॉर्डींग होणार का ? : शरद पवार

शक्तीशाली यंत्रणांशिवाय इतके रेकॉर्डींग होणार का ? : शरद पवार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फडणवीस यांनी काल विधानसभेत आरोप करतांना आपले अप्रत्यक्ष नाव घेतले असले तरी आपला यात जराही संबंध नाही. आणि १२५ तासांचे रेकॉर्डींग करण्यासाठी शक्तीशाली यंत्रणांचा वापर केला असेलच असे नमूद करत शरद पवार यांनी या प्रकरणी पलटवार केला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज प्रसारमाध्यांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या कालच्या आरोपांवर शंका व्यक्त केली. तसेच त्या व्हिडीओत आपला उल्लेख करण्यात आला असून त्याच्याशी आपला काहीच संबंध नसल्याचं म्हटलं आहे. या व्हिडीओतील माहिती खरी आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता-असत्यता तपासेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतं. मोठे साहेब म्हणून माझा उल्लेख आल्याचं मी ऐकलं. माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही, असं शरद पवार यांनी सांगितलं.

दरम्यान, शरद पवार पुढे म्हणाले की, व्यक्तिश: या गोष्टीत माझा कुठलाही संबंध नाही. आमची एक तक्रार आहे. कुणी तरी तक्रार करायची आणि त्या तक्रारीतून लोकप्रतिनधींवर वेगवेगळ्या एजन्सीची मदत घेऊन त्यांना नामशेष केलं जात आहे. बंगाल आणि महाराष्ट्रात त्याची संख्या अधिक आहे, असंही ते म्हणाले.

तपास यंत्रणांचा वापर करूनही महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्याच्या प्रयत्नात यश येत नसल्यानेच ही टोकाची भूमिका फडणवीस यांनी घेतली असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, सरकारी अधिकार्‍यांची १२५ तासांची रेकॉर्डिग होते ही कौतुकास्पद बाब आहे. केंद्रीय तपास यंत्रणांशिवाय हे अशक्य आहे. अनिल देशमुखांविरोधात ९० छापे टाकण्यात आले. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी केली जाते याचं उत्तम उदाहरण देशमुखांचं आहे.

Protected Content