जामनेरात भाजपतर्फे विकास तीर्थ रॅली

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आठ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला असून या काळात त्यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. याबाबत जनतेला माहिती व्हावी, याउद्देशाने येथील भाजप युवा मोर्चा तर्फे आ.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भव्य विकास तीर्थ रॅली काढण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाचा कार्यकाल आठ वर्षे पूर्ण झाली असून त्यांचे विकास कामे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा यांच्यातर्फे बाईक रॅली काढण्यात येत असल्याची प्रतिक्रिया कार्यक्रमात बोलताना भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यकाल आठ वर्षाचा पूर्ण झाला असून त्यांनी या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली आहे त्याबाबत माहिती जनतेपर्यंत पोहोचावा या उद्देशाने जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा च्या वतीने आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात भव्य विकास रॅली काढण्यात आली.

यावेळी बाईक रॅलीला लोकनियुक्त नगराध्यक्ष साधना महाजन यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका उपनगराध्यक्ष प्राध्यापक शरद पाटील, नगर पालिका गटनेते डॉक्टर प्रशांत भोंडे, भाजपा जिल्हा समन्वयक नवल पाटील, नगरसेवक अतिश झाल्टे, जि. प. सदस्य पती विलास पाटील, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, भाजपा सरचिटणीस आनंदा लावरे, रवींद्र झाल्टे, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश चव्हाण, कमलाकर पाटील, दीपक तायडे, तुकाराम निकम, मयुर पाटील, सुभाष पवार, अशोक पाटील, अक्षय जाधव यांच्यासह नगरसेवक जि. प. सदस्य पंचायत समिती सदस्य भाजपा पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने विकास तीर्थ रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे काढण्यात आलेल्या विकास जामनेर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती पासून सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरपालिका चौक महाराणा प्रताप चौक गांधी चौक मार्गे रॅली नेरी पाळधी पहूर मार्ग जामनेर काढण्यात आली. या विकास तीर्थ रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले विकास कामे व कल्याणकारी योजना गोरगरीब जनतेच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी आयोजन करण्यात आले होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!