पुढच्या राष्ट्रपतीपदासाठी विरोधी पक्षांची गोपालकृष्ण गांधींना घातले साकडे

प. बंगालचे माजी उपराज्यपाल आणि म.गांधींचे आहेत नातू

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | युपीए आघाडीतील महत्वाच्या घटक पक्षाचे तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रपती पदासाठी नकार दिल्यानंतर विरोधकांतर्फे  म.गांधींचे नातू  गोपाल कृष्ण गांधींना साकडे घातले असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रपती पदासाठी शरद पवार यांचा पराभव सहन करावा लागू शकतो. त्यामुळे ते या निवडीसाठी इच्छुक नाहीत, तर त्यांच्याऐवजी दुसऱ्या उमेदवाराचा विचार होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर परंतु तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांनी घेतलेल्या बैठकीच्या सभेच्या माहितीचे एकतर्फी पत्र आणि बैठकीचे अंतर केवळ ३ दिवसाचे म्हणत सीताराम येच्युरी यांनी सभेवर आक्षेप असल्याचे म्हटले आहे.

 राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची निवड करण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला असतानाही तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी वेगवान हालचाली करत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे पक्ष, द्रमुक, आप, शिवसेना यांच्यासह अन्य प्रादेशिक पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहून दिल्लीमध्ये बुधवारी कॉन्स्टिटय़ुशन क्लबमध्ये होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन केले होते.

 तृणमूलच्या आक्रमकतेवर काँग्रेस, माकप, द्रमुक आदींची नाराजी

तृणमूल काँग्रेसच्या या आक्रमक भूमिकेवर काँग्रेस, माकप, द्रमुक आदी पक्षांनी आक्षेप घेतला होता. मात्र असे असले तरी काँग्रेसने मात्र ममतांच्या बैठकीला उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असून सोनिया गांधी याच्या सूचनेनुसार काँग्रेसच्या वतीने राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि रणदीप सुरजेवाला हे या बैठकीला उपस्थित होते तर माकप, आप, टीआरएस सह अन्य विरोधी गटातील सदस्य सहभागी झाले नसल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!