विना मास्क फिरणाऱ्या वाहनधारकांवर दंड

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखेने आज शहरातील शास्त्री टॉवर चौकात विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक केली असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देवीदास कुनगर यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यात गेल्या पंधरवाड्यापासून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रूग्ण आढळून आले आहे. खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रात्री १० ते सकाळी ५ वाजेच्या दरम्यान शहरातील शास्त्री टॉवर चौकात शहर वाहतूक आणि शहर पोलीस ठाण्याचे पथकाने विना मास्क फिरणारे नागरीक आणि वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. यात बेशिस्त वाहन चालविणे, तोंडाला मास्क न लावणे, ट्रिपल शिट, नो पार्किगच्या ठिकाणी वाहन लावणे, चारचाकी वाहनात सिट बेल्ट न लावणे, लायसन्स नसणे अशांवर २०० ते ५०० रूपयांपर्यंतचा दंड वसूल केला आहे. यावेळी शहर वाहतूक शाखेचे कैलाससिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय पाटील, जितेंद्र पाटील, रविंद्र भावसार, राजेंद्र उगले, संजय महाले, रविंद्र मोरे यांनी कारवाई केली.

Protected Content