जिल्ह्यात दिवसभरात 1 हजार 405 जणांना कोवीडची पहिली लस तर 392 जणांनी घेतली दुसरी लस

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यातील 22 केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आज दिवसभरात  1 हजार 405जणांना पहिली लस तर 392 जणांना दुसरी लस देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 27 हजार 700 जणांना कोवीशिल्डची पहिली लस देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे. 

फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात आता कोरोना रूग्णांची संख्या वाढत आहे. आज 772 बाधित रूग्ण जिल्ह्यातून आढळून आल्याने आता चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील 22 शासकीय कोवीड लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध करून देण्यात आले आहे. आज शुक्रवार 5 मार्च रोजी दिवसभरात झालेले लसीकरण याप्रमाणे आहेत. जिल्हा शासकीय रूग्णालय- 110, छत्रपती शाहु महाराज हॉस्पीटल- 113, गोल्ड सीटी हॉस्पिटल-0, गाजरे हॉस्पिटल-0, ऑर्किड हॉस्पिटल-0, जैन हॉस्पिटल-0, जामनेर-22, चोपडा-63, मुक्ताईनगर-63, चाळीसगाव-76, पारोळा-94, भुसावळ-219, अमळनेर-68, पाचोरा-28, रावेर-41, यावल-165, भडगाव-41, बोदवड-48, एरंडोल-96, भुसावळ रेल्वे हॉस्पिटल-37, धरणगाव-54, एम.डी. भुसावळ-67 असे एकुण 1 हजार 405 जणांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली आहे. तर कोरोनाची दुसरी लस जिल्ह्यात आज 392 जणांना देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

 

Protected Content