‘जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण? ‘ प्रश्न अनुत्तरीत

WhatsApp Image 2019 07 21 at 9.03.42 PM

जळगाव, प्रतिनिधी | रोटरी क्लब ऑफ वेस्टतर्फे ‘जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण’ हा विषय घेऊन चर्चासत्र मायादेवी नगरातील रोटरी भवनात आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त उदय टेकाळे, रोटरी क्लब ऑफ वेस्ट सुशीलकुमार राणे, माजी अध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव सुनील सुखानी, अँड. सुरज जाहगिरदार, किशोर ढाके व्यासपीठवर उपस्थित होते.

या चर्चासत्रात शहरातील विविध साम्यांवर चर्चा करण्यासाठी सामजिक कार्यकर्त व नागरिक उपस्थित होते. दरम्यान, न्हाईचे सिन्हा, आमदार राजुमामा भोळे, महपौर सीमा भोळे हे गैरहजर होते. आमदार भोळे यांनी त्यांचा प्रतिनिधी पाठवून संदेश दिला. नागरिकांनी शहरातील विविध मूलभूत सुविधा मांडल्यानंतर आयुक्त टेकाळे यांनी त्यांना सविस्तर उत्तर दिले. सिद्धार्थ सोनाळकर यांनी महापालिकेच्या आवारात नवीन घंटा गाड्या केवळ उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. त्यांचा शहरासाठी उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला. याला उत्तर  देतांना आयुक्त टेकाळे यांनी सांगितले की, ह्या घंटा गाड्या सफाई ठेकेदाराला त्याच्याकडून रक्कम घेऊन वापरासाठी देण्यात येतील अशी माहिती दिली. या घंटा गाड्यांवर जीपीएस सिस्टिम बसविण्यात येणार आहे. यामुळे त्याचे लोकेशन कळणार असल्याने कचरा व्यवस्थितपणे गोळा करण्यास मदत मिळणार असल्याचे सांगितले. अरविंद दहाड यांनी आयुक्त यांना अमर्याद अधिकार आहेत. त्यांचा वापर करा, कर्तव्यापासून दूर जाऊ नका अशी अपेक्षा व्यक्त केली. गळ्याचा प्रश्न निकाली निघत नसल्याने मला १५ दिवस आयुक्त पदाची सूत्रे द्या गाळेधारकांकडून वसुली करून दाखवतो असे आव्हान आयुक्तांना केले. आयुक्त हे दबावाखाली काम करिता असून तुकराम मुंडे यांच्या सारखे अधिकारी महापालीलेका पाहिजेत अशी
अपेक्षा व्यक्त केली. शिवराम पाटील यांनी शहरातील स्पीड ब्रेकरची उंची कमी करावी, अमृत योजनेबाबत अनेक तक्रारी येत असून त्या तक्रारींचे निरसन व्हावे असे सांगितले. जहांगीर यांनी अमृत योजनेमुळे शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली आहे. ते सपत्नीक मोटरसायकलने जात असतांना पडल्याने दुखापत झाली असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेत वैद्यकीय अधिकाऱ्याचे पद मागील दहा वर्षापासून रिक्त असल्यने शहरातील नागरीकांचा आरोग्य प्रश्न गंभीर बनला असल्याचे सांगितले. शहरातील आस्थापनांचा फायर ऑडीट करणे गरजेचे असल्याचे सांगितले. याला उत्तर देतांना आयुक्त म्हणाले की, ते कोणत्याही दबवाखाली काम करत नसल्याचे स्पष्ट करत केले. आमदार, महापौर, न्हाईचे अधिकारी गैरहजर राहिल्याने काही ‘जळगावकरांच्या त्रासाला जबाबदार कोण’ हा प्रश्न अनुत्तरीत राहिला.

 

पहा लाईव्ह चर्चासत्र ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ च्या फेसबुक पेजवर
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/888930204803045/

Protected Content