घर कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  राज्यातील असंघटित कामगारांच्या दृष्टीने महागाई व रोजगारांसह इतर प्रलंबित मागण्यासाठी मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) आणि घर कामगार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली, तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्यात दुष्काळ जाहीर करा शेतकरी, शेतमजूर यांची पूर्ण कर्ज माफ करा, पिक विमा कंपन्यांना संपूर्ण पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावे, सर्व क्षेत्रातील असंघटित कामगार व संघटित कामगारांना किमान वेतन २६ हजार रुपये दरमहा मंजूर करण्यात यावा, कार्पोरेट व कामगार श्रमिक विरोधी चार कायदे त्वरित रद्द करावे, सर्वांना मोफत शिक्षण आरोग्य सुविधा प्रदान करावी, गरिबांना शिक्षण नाकारणारे नवे शैक्षणिक धोरण तातडीने रद्द करावे, हयातीची पेन्शन योजना रद्द करा व जुने पेन्शन सर्वांना लागू करा, महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात होत असलेले गैरप्रकार व भ्रष्टाचार त्वरित थांबवावे, यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी आज मंगळवारी २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी टू आणि घर कामगार संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली या आंदोलनाचे नेतृत्व कॉम्रेड विजय पवार आणि रवींद्रसिंग चव्हाण यांनी केले. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील असंघटन कामगारांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content