जळगावात महिलेचा विनयभंग; तरूणास अटक

MIDC Police karmachari

जळगाव प्रतिनिधी । घरासमोर भांडी घासत असतांना महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तांबापूरातील तरूणाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पिडीत महिला शनिवारी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर अंगणात भांडी घासत असतांना संशयित आरोपी शेख कलीम शेख रफिक (वय -20) रा. जुम्मा शहा वखारजवळ तांबापुरा याने पिडीतीचे दोन्ही गाल पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात शेख कलीम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपीस पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी यांनी रात्री अटक केली होती.

Protected Content