धरणगाव नगराध्यक्ष निवडणुकीत दुपारी ३.३० पर्यंत ४२.८० टक्के मतदान

 

धरणगाव, प्रतिनिधी | येथील लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आज (दि.२९) दुपारी ३.३० पर्यंत ४२.८० टक्के मतदान झाले आहे.
त्यामध्ये ६७०४ पुरुष तर ६७०४ महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण मतदान १३४०८ एवढे झाले आहे.

 

या निवडणुकीत शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अधिकृत उमेदवारांमध्ये प्रमुख लढत होत असून काही अपक्ष उमेदवारही रिंगणात आहेत. हे अपक्ष मतदारांवर किती प्रभाव पाडतात, यावर कोण विजयी होणार त्याचे गणित ठरण्याची शक्यता आहे.

Protected Content