रसलपुर शेती-शिवारमध्ये बिबट्याचा मुक्त संचार

bibtya halla

रावेर, प्रतिनिधि | तालुक्यातील रसलपुर येथे बिबट’चे दर्शन झाले त्याचा मुक्त संचार सुरु असून शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतक-यांनी याबाबत वनविभागाकडे माहिती दिली असता तो बिबट नसून तडस असल्याचे सांगण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, रावेरपासून दोन किमी अंतरावर असलेल्या रसलपुर शेती-शिवारमध्ये येथील शेतक-यांना बिबट’चे दर्शन झाले. लोकांनी आरडा-ओरड केल्यानंतर त्या बिबटने पोबारा केला याची माहिती वन विभागाचे मिळताच वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्या सूचनेवरुन वनपाल संजय भदाने घटनास्थळी दाखल झाले असता त्याचे पगमार्ग आढळुन आले नाही तसेच गावक-यांच्या सांगण्या वरुन तो बिबट नसून तडस असल्याचे वन विभागा कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Protected Content