यावल-चुंचाळे बस सेवा पुनश्च सुरू करावी : ग्रामस्थांचे निवेदन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील एसटी बस आगारातुन नियमित सुटणाऱ्या चुंचाळे गावासाठीच्या बसगाडया पुर्वरत सुरू कराव्यात अशी मागणी चुंचाळे गावातील सामाजिक कार्यकर्त यांनी यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांना दिलेल्या एका निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

आगार व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,यावल आगारातुन नियमित सुटणारी बससेवा पुढील प्रमाणे सकाळची ७:१५ वा.ची गाडी,बस,(यावल चुंचाळे मार्गे नायगांव जळगांव), तसेच दुपारी १:३० वाजता येणारी बस (यावल चुंचाळे मार्गे नायगांव) आणि संध्याकाळची ८:०० वाजेची बस (जळगांव यावल मार्गे नायगांव चुंचाळे) या बससेवा रस्ता अत्यंत खराब व नादुस्त असल्याकारणाने या बससेवा बंद करण्यात आल्या होत्या. या बसगाडया पुर्वरत करण्यासाठी या आदीच बोराळे येथील सामाजिक कार्यकर्ते सुपडु संदानशिव यावल आगार प्रमुख दिलीप महाजन यांना निवेदन दिले आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत बसेस सुरू न झाल्यास चुंचाळे फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात येईल अशी माहिती निवेदनाद्वारे दिली आहे.

चुंचाळे जाणाऱ्या बसगाडया मागील काही महिन्यांपासून चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतचा रस्ता नादुरुस्तीचे कारण दाखवून बंद करण्यात आले आहेत यामुळे शालेय शिक्षण घेणारे मुले मुली तसेच दोन्ही चुंचाळे व बोराळे नायगाव गावातील नागरिक यांचे यांचे नाहक हाल होत असून दैनंदिन जीवनात होणाऱ्या कामाला अडथळा निर्माण होत आहे. विद्यार्थी मुला मुलींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तरी निवेदनात दिलेल्या तिन्ही बस लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या. अन्यथा दोन ते तिन दिवसा नंतर चुंचाळे फाट्या वरअंकलेश्र्वर बऱ्हाणपूर रत्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी. सदर आंदोलनास वेगळे वळण लागल्यास होणाऱ्या नुकसानास सर्वतोपरी आपण जबाबदार राहाल तरी निवेदनात नमूद केलेल्या बसेस लवकरात लवकर सुरू करण्यात याव्या अशी मागणी निवेदनाद्वारे तसेच चुंचाळे ग्राम पंचायतच्या लोकनियुक्त सरपंच नौशाद तडवी आणि बोराळे ग्राम पंचायतच्या सरपंच सौ संध्या राजपुत वतीने या आदी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे. निवेदनावर पत्रकार प्रकाश चौधरी, विकी वानखेडे व सुपडू संदानशिव,किरण तायडे यांच्या स्वाक्षरी आहे.

Protected Content