कोळगावच्या हवामान मापक केंद्रावर शेतकरी धडकले

भडगाव- धनराज पाटील। निकष पूर्ण न केल्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याप्रकरणी आज शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत तालुक्यातील कोळगाव येथील हवामान मापक केंद्रावर धडक दिला. व अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

भडगाव तालुक्यातील कोळगाव महसूल मंडळातील पिचर्डे, बात्सर , कोळगाव, गुढे प्रिंप्रीहाट,पांढरद व बोदर्डे परिसरातील गावांना पीक विमा लाभापासुन वंचित ठेवल्यामुळे आज कोळगाव येथील हवामान मापक केंद्रास परिसरातील शेतकरीनी धडक दिला. व कुषी अधिकारी, विमा प्रतिनिधी, जिल्हा हवामान मापक प्रतिनिधी यांना शेतकऱ्यांनी धारेवर धरले. भडगाव महसूल मंडळ पात्र ठरलेले असताना हवामान मापक केंद्राचे निकष पूर्ण न केल्याने व चुकीच्या जागेवर हवामान मापक केंद्र बसवल्यामुळे परिसरातील केळी विमा धारक विम्यापासुन वंचित राहिले आहे. तसेच हवामान मापक केंद्र सदोष का ? असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला. दरम्यान सर्व चुकीस हवामान मापक केंद्र व अधिकारी जबाबदार आढळल्यामुळे शेतकऱ्यांचा जागेवर पंचनामा करण्यात आला.

यावेळी तालुका कृषी अधिकारी बी.बी.गोर्डे, विमा कंपनी प्रतिनिधी विष्णू खेडकर, हवामान मापक केंद्र प्रतिनिधी नितीन पाटील सह कोळगाव बिटचे हवालदार पांडुरंग सोनवणे, एकनाथ पाटील यांच्या सह परिसरातील शेतकरी कोळगावचे बालुदादा पाटील ,अनिल बि्हाडे,पिंप्रीहाटचे भुषण पाटील, भुषण शेषराव पाटील, लक्ष्मण पाटील, पथराड चे रमेश पाटील, बोदर्डे चे सोमनाथ पाटील, बात्सरचे योगेश पाटील, पत्रकार विनोद पाटील, उत्तम पाटील, वसंत पाटील, उत्तमराव पाटील, अतुल पाटील, मयुर पाटील, पत्रकार संजय हिरे, पिचर्डेचे विनोद पाटील, दिपक महाजन, अशोक पाटील, पिचर्डे उपसरपंच दिपक महाजन, प्रकाश महाजन, राजेंद्र महाजन, रावबा महाजन, राजेंद्र पाटील, भुषण येवले, गौरव सोनवणे यांच्या सह परिसरातील पिकविमाधारक शेतकरी उपस्थित होते

Protected Content