यावल-भुसावळ राज्य मार्ग पुन्हा खड्डेमय : सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरूस्तीची मागणी

यावल , प्रतिनिधी |  यावल ते भुसावळ मार्गावरील प्रमुख रस्ता हा पुनश्च खड्डेमय झाल्याने या रस्त्यावर मोठया अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  यावल सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी वाहनधारकाकडुन करण्यात येत आहे.

 

यावल ते भुसावळ या राज्य मार्गावर मागील काही वर्षापासून वावरणाऱ्या अवजड वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. या अवजड वाहनांची वजन क्षमता ही मार्गावर धावणाऱ्या इतर वाहनाच्या तुलनेत किती तरी पटीने अधिक असल्याने या मार्गावरील जमीनीची क्षमता ही१०  १२ टनाचीच आहे.  असे असतांना या मार्गावर धावणाऱ्या परप्रांतीय अवजड वाहने  हे २० ते २५टन क्षमतेने भरलेली असतात.  या अवजड वाहनाची वर्दळ सातत्याने वाढत असल्यामुळे या मार्गावरील रस्ता हा वारंवार दुरुस्त केल्यावर सुद्धा हा रस्ता सिंक होत असल्याने रस्त्यावर ठिक ठिकाणी  मोठमोठे जिवघेणे खड्डे निर्माण झाले आहेत.  दरम्यान या पुर्वी अनेक वाहनांचे अपघात होवुन निरपराध नागरीकांना अपले जिव गमवावे लागले आहे. यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील रस्त्याची गुणवत्ते दुरुस्ती केल्यास व क्षमतेपेक्षा अधिक वजनांच्या धावणाऱ्या वाहना प्रतिबंधित केल्यास व मार्गावरील पडणाऱ्या खड्डयांना वेळीच दुरुस्त केल्यास अपघात टाळता येइल अशी अपेक्षा वाहनधारकांकडुन व्यक्त होत आहे .

 

Protected Content