न्हाईला ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशनतर्फे विविध मागण्यांचे निवेदन

यावल, प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यातील वाहनधारकांना नशिराबाद टोल नाक्यावर आकारणीत सूट  मिळावी  तसेच जिल्ह्यातील स्थानिक लोकांना रोजगार मिळणेबाबत आणि फोरवेसाठी १०० कि.मि.साठी एकच टोल नाका असणे आवश्यक असून फेकरी टोल नाका सुरु असून तो तत्काळ बंद करण्यात यावा अशी मागणी जळगाव ग्रामीण कॉंग्रेस सेवा फाउंडेशन  जिल्हाध्यक्ष  जलील सत्तर पटेल यांनी महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

 

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प अधिकारी चंद्रकांत सिन्हा यांनी दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, जळगाव जिल्ह्यातील सर्वप्रकारच्या वाहनधारकांना टोल मध्ये ८०% सूट मिळावी. भुसावळ जळगाव चौपदरी  रस्त्यावरील नशिराबाद टोल नाक्यावर ‘भुसावळ वेतिरिक्त ८५ रुपये दराने टोल आकारणी केले जात आहे. रावेर व यावल तालुक्यातील सर्व वाहनधारक भुसावळ ते जळगाव या लांबीतील ‘भुसावळ येथील वाहनधारकाप्रमाणेच ‘भुसावळ जळगाव या रस्त्या वापर करीत रावेर यावल तालुक्यातील वाहनाना होणारी आकारणी ८५ रुपये असून ही अन्यायकारक आणि चुकीची आहे. तरी यावर आपण वरिष्ठ पातळीवर बोलून योग्य तो निर्णय घेऊन वाहनधारकांना व शेतकऱ्यांना, नोकरदारांना,  व्यापाऱ्यांना होणारा ‘भूदंड कमी करावा तसेच ६० कि.मी.च्या आत टोल नाक्यावर सगणक चालक सह सुरक्षा रक्षक फॉस्टट्रक आणि इतर कामामध्ये स्थानिक लोकांना रोजगार द्यावा तसेच नियमानुसार फोरवे साठी १००कि.मी.ला एक टोल नाका असा नियम असून सुद्धा नशिराबाद नंतर लगेच फेकरी टोल नाक्यावर सुद्धा टोल वसुली सरू आहे.  फेकरी टोल नाका त्वरित बंद करावा .  येत्या काही दिवसात या मागण्या मान्य न झाल्यास मोठे जन आदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर विलास अडकमोल, सद्दाम शहा, मीनाक्षी जवरे आदींची स्वाक्षरी आहे.

 

Protected Content