पाचोरा येथील महावितरण कार्यालय चोरट्यांनी फोडले

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा शहरातील संगवी कॉलनी येथे महावितरणचे बंद ऑफिस अज्ञात चोरट्यांनी फोडून सामानाची नासधूस करून कागदपत्रे फेकण्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, पाचोरा शहरातील संगवी कॉलनी येथे महावितरण कंपनीचे कार्यालयत आहे. याठिकाणी ३ ऑक्टोबर दुपारी ४ ते ४ ऑक्टोबर सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने महावितरणाचे बंद कार्यालय फोडून आत प्रवेश करत लोखंडी कपाट तोडले. कपाटात ठेवलेले कागदपत्र फेकून नुकसान केले आहे. याप्रकरणी अतिरिक्त कार्यकारी अभियंता रवींद्र शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.फौ. प्रकाश पाटील करीत आहे.

Protected Content