जुनोने येथे महिलेचे बंद घर फोडले; रोकडसह सोन्याचे दागिने लांबविले

अमळनेर प्रतिनिधी ! तालुक्यातील जुनोने गावातील एका महिलेच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने चोरी करून घरातील रोकडसह सोन्याचे मंगळसूत्र असा एकुण १ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी अमळनेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, मालतीबाई कैलास पाटील (वय-५२) या महिला आपल्या कुटुंबीयांसह राहतात. शेती काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. सोमवारी ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेच्या दरम्यान ते घराला कुलूप लावून शेतात कापूस वेचण्यासाठी गेल्या होत्या. बंद घर असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून घरात ठेवलेल्या लोखंडी कोटीतील ९३ हजार रुपयांची रोकड आणि १५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी मालती पाटील यांच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरसिंग वाघ करीत आहे.

Protected Content