गेंदालाल मिल परिसरात बंद घर फोडले; ३५ हजाराचा ऐवज लांबविला

जळगाव प्रतिनिधी । शहरातील गेंदालाल मिल परिसरात बंद घरफोडून चोरट्यांनी ३५ हजारांची रोकडसह दागिने अज्ञात चोरट्यांला लांबविल्याची घटना उघडकीला आली आहे.  शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

सविस्तर माहिती अशी की, गेंदालालमील संभाजी चौकातील रहिवासी गौरव सतिष राणे (वय-२१) हे साऊडसिस्टीमचा व्यवसाय करतात. गौरव यांचे काका गजाजनन प्रताप राणे (रा.रामानंदनगर) यांचे सेामवार ७ जून रोजी  रेाजी भडगाव येथे निधन झाले. माहिती मिळताच गौरव कुटूंबीयांसह घरबंद करुन काकांच्या रामानंदनगर येथील घरी गेले होते.  भडगाव येथून मृतदेह आणल्यानंतर जळगावी त्यांच्यावर अंत्यसस्कार करण्यात आले. परिणामी गौरव यांचे कुटूंबीय रामानंदनगर येथेच थांबुन होते. नातेवाईकांची गर्दी असल्याने अंत्यविधी अटोपुन बुधवार (ता.९) रोजी रात्री गौरव राणे त्यांच्या गेंदालालमील येथील घरी पोहचले. त्यांच्या घराला लावलेले कुलूप तूटलेल्या अवस्थेत खाली पडलेले होते. घरात गेल्यावर आत घराती सर्व साहित्य अस्ताव्यस्त फेकलेले आढळून आले. कपाटाचे कूलूप तोडून चोरट्यांनी ३५ हजार रुपये रोख सेान्याचे लहान पेंडल, चांदीच्या साखळ्या, असा ४५ हजारांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे दिसून आले. राणे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content