बोदवड पोलीस स्टेशनला जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट

बोदवड प्रतिनिधी । बोदवड पोलिस स्टेशनमध्ये नुकतीच जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी भेट देत विविध विषयांसह पोलिस स्टेशनचा वार्षिक आढावा घेतला.

या वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने पोलिस स्टेशनचे सुशोभीकरण व नुतनीकरणाचा कार्यक्रम जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.विवेक लावंड यांच्या हस्ते पार पडला. यावेळी बोदवड पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी केलेल्या कौतुकास्पद कामगिरी व जनतेचे होत असलेले सहकार्य याबाबत त्याची गौरवोद्गार काढले.

पोलिस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे यांनी आपल्या मनोगतात तालुक्यातील जनतेचे पोलिस प्रशासनाला होत असलेले सहकार्य व पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांची कामगिरी कौतुकास्पद असून पोलिस निरीक्षक श्री.गायकवाड हे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी योग्यरीत्या कामगिरी बजावत असल्याने आम्हाला वारंवार पोलिस स्टेशनला भेट देण्याची गरज नसते.अनेकदा नकारात्मक बातम्या बरोबरच चांगल्या कामांची सुध्दा प्रसिध्दी झाली पाहिजे.निव्वळ नकारात्मक बातम्यांची वाहवा करण्यापेक्षा चांगल्या बातम्या सुध्दा समोर आल्या पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पोलिस स्टेशनच्या या वार्षिक आढावा बैठकीच्या निमित्ताने सर्वांचे आभार मानत पोलिस निरीक्षक व कर्मचारी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देत आपल्या मनोगताचा शेवट केला. यावेळी शहर तथा तालुक्यातील व्यापारी वर्ग, पोलिस पाटील, सर्वपक्षीय कार्यकर्ते यांसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Protected Content