जिल्हा न्यायालयाच्या जागेचा प्रश्‍न लागणार मार्गी; नगरविकास मंत्र्यांनी दिली ग्वाही

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा न्यायालयास ट्रॅफीक गार्डनच्या मागील विस्तारीत जागेत स्थलांतरीत करण्यासाठी आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्यासह सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके आणि अ‍ॅड. संजय राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यात त्यांनी या प्रस्तावाला सकारात्मकता दर्शविल्यामुळे न्यायालयाच्या जागेचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, आज नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे यांची मुंबई येथे त्यांचे मलबार हिल येथील नंदनवन बंगल्यामध्ये माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. केतन ढाके व अ‍ॅड. संजय राणे यांनी भेट घेतली. या भेटीत जळगाव जिल्हा न्यायालयासाठी प्रस्तावीत असलेल्या ट्रॅफीक गार्डन च्या जागे संदर्भात चर्चा झाली. न्यायालयच्या जागेची अत्यंत निकड असुन सध्या न्यायालय असलेल्या जागेत वकील व पक्षकार बांधवांना किती अडचणींचा सामना करावा लागतो याबाबत सविस्तर चर्चा केली.

याप्रसंगी नवीन जागेचा प्रस्ताव  आपलेकडे आला असुन त्या प्रस्तावाला लवकरात लवकर मंजुरी द्यावी अशी विनंती केली, त्यांवर  ना. एकनाथ शिंदे यांनी सदरचा विषय न्यायालयाचा असल्याने व आपण सांगीतलेल्या अडचणी रास्त असल्याने व न्यायालयासाठी जागा आवश्यक असल्याने संबंधीत अधिकारी यांना बोलवून त्वरित प्रस्ताव सादर करुन मंजुर करण्यासाठी ठेवा असे आदेश दिलेत. व येत्या काही दिवसातच नवीन जागेबाबत मंजुरी मिळेल असे आश्‍वासन दिले.

यामुळे न्यायालयाच्या नवीन जागेचा विषय येत्या काही दिवसातच मार्गी लागणार असुन न्यायालयाच्या जागेबाबत अनेक वर्षांपासुनचा विषय मार्गी लागण्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.

 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.