धरणगाव पंचायत समिती सभापतीपदी प्रेमराज पाटील

धरणगाव प्रतिनिधी । येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी प्रेमराज पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंद नन्नवरे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर आता प्रेमराज पाटील यांची वर्णी लागली आहे. . सभापती पदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रेमराज पाटील यांचा सत्कार केला. या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील, तालुका प्रमुख गजानन पाटील, रवींद्र चव्हाण, संजय पाटील, माजी सभापती मुकुंद नन्नवरे, सचिन पवार, सदस्या शारदा पाटील, सुरेखा पाटील, मोती पाटील, दामू पाटील, सुभाष पाटील, चंद्रशेखर भाटिया, पुंडलिक पाटील, मोहन सातपुते, योगेश पाटील, महेश पाटील, अधिकार पाटील, भय्या पाटील, नाना ठाकरे, भूषण माळी आदी उपस्थित होते.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.