मोदी-ठाकरे भेटीची मनसेची उडविली खिल्ली !

मुंबई प्रतिनिधी । काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांची घेतलेली भेट चर्चेत असतांना आता याच भेटीवरून मनसेने शिवसेनेची खिल्ली उडविली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राज्याचे शिष्टमंडळ दिल्लीत गेले होते. या शिष्टमंडळात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचाही समावेश होता. राज्यातील विषयांवर या शिष्टमंडळाशी चर्चा झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एक खासगी बैठकही झाली.

याच बैठकीवरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेची खिल्ली उडविली आहे. आजच्या वैयक्तिक आणि बंद खोलीतल्या बैठकीत पंतप्रधान पद अडीच अडीच वर्षे वाटून घ्यायचा निर्णय तर झाला नाही ना? झाला असेल तर आत्ताच सांगा नंतर कटकट नको, असे संदीप देशपांडे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Protected Content