गुप्तचर यंत्रणेकडून सूचना मिळूनही दक्षतेत कमतरता

मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – गेल्या सप्ताहात न्यायालयाच्या निकालानंतर शुक्रवारी दुपारी अचानक संपकरी कर्मचाऱ्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात गुप्तचर विभागाकडून सूचना मिळूनही पोलीस विभागाकडून पुरेशा प्रमाणात दक्षत घेतली गेली नाही.यात अधिक चौकशी सुरू असून चौकशीत सत्यता बाहेर येईलच, त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल,   असे राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे.

राज्यात गेल्या पाच महिण्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचे आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केले जात होते. या संपाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे एसटी कर्मचाऱ्यांकडून जल्लोषात स्वागत देखील करणात आले.  मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर गुप्तचर विभागाने सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात गोपनीय माहिती पोलीस यंत्रणेला पत्रव्यवहारद्वारे केली होती, आवश्यक प्रमाणात बंदोबस्त ठेवणे गरजेचे होते. परंतु तरी पोलीस विभागाची यात कमतरता राहिली. त्यामुळेच  एसटी कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी घोषणाबाजी करीत गोंधळ माजवला.

अचानक घडलेल्या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह १०९ जणांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने कालच त्यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  तसेच या  घटने संदर्भात चौकशीचे आदेश करण्यात आलेले  असून या चौकशीत पोलिसांना जी काही माहिती उपलब्ध होत आहे, ती माहिती पोलिसांकडून न्यायालयात सादर केली जात आहे. या संदर्भात चौकशीचा भाग कोणता आणि काय आहे, हे माहित नाही,  संबंधित पोलीस आयुक्तांची बदली करण्यात आली असून गावदेवी पोलीस ठाण्यात नियुक्तीवर असलेल्या पोलीस निरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे.  सुरु असल्येल्या चौकशीत सत्यता बाहेर येईलच, त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल.  शिवाय हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने यावर काही भाष्य करणे किंवा माहिती उघड करणे काही योग्य होणार नसल्याचे गृहमंत्री ना. दिलीप वलसे-पाटील यांनी म्हटले आहे.

 

 

Protected Content