Fraud : व्यापाऱ्यांची लाखो रूपयात फसवूणक करणाऱ्या दोन जणांवर गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगावातील आणि इतर जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना विश्वास संपादन करून त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू विक्रीसाठी घेवून सुमारे ६० लाख २२ हजारांची फसवणूक करणाऱ्या दोन जणांविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

लग्नाचे आमिष दाखवत नागपूरातील तरूणीवर वारंवर अत्याचार करून दिले वाऱ्यावर सोडून

 

शहरातील डेमला कॉलनीतील रहिवासी महेंद्र सतिषचंद्र ललवाणी यांचे जी. एस. ग्राऊंडजवळ समर एजन्सीज नावाचे इलेक्ट्रॉनिक्स साहित्य विक्रीचे दुकान आहे. दरम्यान निलेश शांताराम पाटील व दिनेश पाटील या दोघांनी सन २०१३ मध्ये श्री इलेक्ट्रॉनिक्स शॉपी नावाने नाथप्लाझा येथे दुकान सुरु केले होते. हे दोघ ललवाणी यांच्याकडून होलसेल भावात इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू घेवून जात होते. त्यांनी ३१ जुलै २०१३ ते ३१ मार्च २०२१ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घेवून रोख व उधारीने घेवून जात होते.

 

काही वेळा रोख तर काही वेळा उधारीने वस्तू घेवून जात असल्याने त्यांनी ललवाणी यांचा विश्‍वास संपादन केला. दरम्यान त्यांच्याकडे सुमारे ११ लाख ८६ हजार ७३ रुपये बाकी आहेत. त्यांना बाकी असलेल्या पैशांसाठी फोन करुन व त्यांच्या घरी जावून मागणी केली असता, त्यांच्याकडून पैसे देण्यास टाळाटाळ केली जात होती.

 

महेंद्र ललवाणी यांनी निलेश व दिनेश पाटील या दोघांबद्दल मार्केटमध्ये विचारपूस केली असता, त्यांना अनेक व्यापार्‍यांचे त्यांच्याकडे पैसे असल्याची धक्कादायक माहिती त्यांना समजली. त्यामुळे ललवाणी यांच्यासह अनेक व्यापार्‍यांना दोघांनी लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला. भुसावळ, धुळे , पुणे आणि जळगावातील काही व्यापाऱ्यांना एकुण ६० लाख २२ हजारांची फसवणूक केल्याचे समोर आले. याप्रकरणी महेंद्र ललवाणी यांनी सोमवारी ११ एप्रिल रोजी सायंकाळी शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली .त्यांच्या तक्रारीवरून निलेश शांताराम पाटील व दिनेश शांताराम पाटील दोघ रा. प्लॉट नंबर १२ भुरेमामलेदार प्लॉट, शिवाजीनगर या दोघांविरुद्ध शहर पोलिसात फसवूणकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content