आदिवासी कोळी बांधवांच्या अन्नत्याग सत्याग्रहास बीआरएस पक्षाचा पाठींबा

कोळी बांधवांसोबत बीआरएस ने केला जळगावला रास्ता रोको

जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी कोळी बांधवांच्या न्यायहक्कांच्या मागण्यासाठी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनास भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र चे वतीने पाठींबा देण्यात आलाय. शनिवारी 28 रोजी आकाशवाणी चौकात BRS पक्षाचे जिल्हाध्यक्ष जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा यांचे नेतृत्वात रास्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्यात आले. मोठ्या संख्येने कोळी समाज बांधव तसेच BRS पक्षाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

या सरकार च करायच काय खाली डोक वर पाय ,कोण म्हणत देणार नाही घेतल्या शिवाय राहणार नाही,अबकी बार किसान सरकार, अशा घोषणांनी आकाशवाणी चौक परिसर दुमदुमून गेला होता.

उपोषण स्थळी प्रथमत महर्षि वाल्मिकी जयंती निमित्त सर्वानी आरती आणि पूजन करण्यात आले.घोषणा देत आकाशवाणी चौकात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी BRS पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष लक्ष्मण गंगाराम पाटील ऊर्फ लकी अण्णा,भाऊसाहेब सोनवणे, प्रभाकर कोळी,मंगलाताई कोळी,लोटन सोनवणे,महेंद्र सोनवणे,राजेंद्र कोळी, विलास घुगे,भगवान धनगर,नितीन तायडे, भिकन सोनवणे,सुभाष सुरवाडे,किरण चौधरी, गोकुळ रडे,सचिन धुमाळ,भैय्या ताडे, रवि बावीस्कर, विजय पाटील,नरेंद्र पाटील यांसह सर्व कोळी बांधव भगिनी आणि बी आर एस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट: “विनाअट आदिवासी कोळी समाजबांधवांना जातीचे दाखले नोंदींवरून सरसकट मिळावेत, रक्ताच्या नात्यातील व्यक्तींना कोणतेही कागदपत्र न मागता जातवैधता प्रमाणपत्र मिळावे तसेच जातपडताळणी समितीचे कार्यालय कायमस्वरूपी जळगाव येथे करावे. यांसह विविध दहा मागण्यांसाठी आदिवासी कोळी जमातीच्या पदाधिकार्यांनी आदिवासी कोळी समाजा तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग सत्याग्रह सुरु आहे . कोळी बांधवांच्या या लढ्यास बीआरएस पक्ष म्हणजेच भारत राष्ट्र समिती यांचे वतीने आम्ही पूर्ण पाठींबा देत आहोत.”

– लकी टेलर, जिल्हाध्यक्ष, BRS पक्ष

“कोळी समाज बांधवांच्या या प्रश्नाला शासनाने आणि प्रशासनाने त्वरित सोडवावे अन्यथा सर्व बांधव आता रस्त्यावर उतरत आहेत सर्वस्वी जबाबदारी शासनाची आणि प्रशासनाची आहे”.

– प्रभाकर कोळी .

“या सत्याग्रहात जे उपोषण करत आहेत त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. त्यामुळे आता तरी सरकारने याकडे लक्ष द्यावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा आम्ही देत आहोत.

-भाऊसाहेब सोनवणे.

Protected Content