भूमिगत गटारींच्या चेंबरच्या लोड टेस्टला प्रारंभ

जळगाव प्रतिनिधी । सध्या शहरात सुरू असणार्‍या भूमिगत गटारींच्या कामांची लोड टेस्ट करण्यात आली असून याचा पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.

अमृत अभियानांतर्गत शहरात सुरू असलेल्या गटारीवर उभारण्यात आलेल्या चेंबरचा लोड टेस्टला बुधवारी सुरूवात करण्यात आली. या चाचणीला कानळदा रस्त्यापासून सुरुवात करण्यात आली. या वेळी महापौर भारती सोनवणे, नगरसेवक कैलास सोनवणे, शहर अभियंता अरविंद भोसले, योगेश बोरोले, भूमीगत गटारीच्या कामाचे मक्तेदार प्रतिनिधी आणि अभियंता उपस्थित होते. याप्रसंगी १७ टन इतक्या वजनाचा लोड नोंदविण्यात आला.

दरम्यान, पहिल्या दिवशी १० चेंबरची तपासणी पूर्ण झाली असून दररोज ५ चेंबर तपासले जाणार आहे.

Protected Content