गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवले वीज निर्मितीचे उपकरण

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मानवी शक्ती व सौर ऊर्जा वापरून वीज निर्मितीचे उपकरण बनवले आहे.

 

गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील यंत्र विभागातील विद्यार्थ्यांचे प्रकल्प सत्र सुरू आहे. या प्रकल्प सत्रामध्ये वेगवेगळ्या विषयावर प्रकल्प सादर करावे लागतात. त्या अनुषंगाने अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी विद्युत ऊर्जा तयार करणार्‍या पायर्‍या (स्टेप्स) यावर प्रकल्प तयार केलेला आहे. मानवी शरीरातील गतिज ऊर्जेचा उपयोग करून सदर यंत्र काम करते. रॅक आणि पिनियन पद्धतीचा मेकॅनिझम चा उपयोग या ठिकाणी केलेला आहे. निर्माण झालेल्या ऊर्जेला सौर ऊर्जेची जोड दिल्यास चार्जिंग टाईम कमी होऊन कार्य वेळ वाढतो. वरील उपकरणाचे मॉडेल तयार करण्यासाठी यंत्र विभागाचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी यशवंत बडगुजर, तुषार सोनवणे, चेतन अलकारी, भूषण घुले यांनी मेहनत घेतली. या विद्यार्थ्यांनी उपकरणासाठी वेगवेगळ्या स्टेप्ससाठी डिझाईन केले आहे. साधारण २५० स्टेप्स ते एक हजार स्टेप्सच्या माध्यमातून चांगल्या प्रकारच्या २०व्ही ५०व्ही क्षमतेची वीजनिर्मिती करता येते. या पटीमध्ये आपण वीज निर्मिती करू करू शकतो. तसेच उपकरणांमध्ये चेन ड्राईव्ह मेकॅनिझम वापरले आहे. त्याद्वारे रेसिप्रोकेटींग मोशन हे रोटरी मोशनमध्ये रूपांतरित करून त्याचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतरित होऊन बॅटरीमध्ये केमिकल एनर्जी म्हणून बचत केली जाते. या प्रोजेक्टसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार तसेच विभाग प्रमुख प्रा. तुषार कोळी व प्रकल्प समन्वयक प्रा.किशोर महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.

Protected Content