बिजनेस अॅडमिनीस्ट्रेशनच्या दोन्ही पेपरात घोळ ; पुनर्परीक्षा घेण्याची युवासेनेचे मागणी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच दि.२३ रोजी विद्यापीठ मार्फत घेण्यात आलेल्या वाणिज्य शाखेचा बिजनेस अॅडमिनीस्ट्रेशनच्या दोन्ही पेपरात मोठ्या प्रमाणात प्रिंटींग त्रुटी आढळून आल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये याकरिता पुनर्परीक्षा घेण्याची मागणी युवासेनेने केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, सहाव्या सत्राचा पहिला आणि दुसरा पेपर झाला यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रिंटिंगच्या त्रुटी आढळून आल्याने परीक्षर्थ्यामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या त्रुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे पेपर अपूर्ण राहिले. सलग एक ओळीत सर्व प्रश्न आले असल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न नेमके काय हेच समजले नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून युवासेनेतर्फे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू यांना निवेदन देऊन लवकरात लवकर यावर मार्ग काढून पुन्हा संबंधित विषयचे पेपर लवकरात लवकर घ्यावे आणि विद्यार्थ्यांन होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. याप्रसंगी विद्यापीठ संपर्क युवा अधिकारी अंकित कासार, विभाग युवा अधिकारी अमोल मोरे, चेतन कापसे, युवासेनेचे अँड.अभिजित रंधे, महाविद्याल विद्यार्थी यश विजय सरोदे, सुधांशू गणेश चौधरी, लकी चौधरी, अभिषेक अशोक सारस्वत, महेश पाटील,लोकेश किशोर चौधरी,किरण बापू पाटील,कल्पेश कोळी,हेमत पाटील विद्यार्थी उपस्थित होते.

Protected Content