रेल्वे स्टेशन मास्टर ३१ मे रोजी सामुहिक रजेवर जाणार!

नवी दिल्ली, लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा |   रेल्वे प्रशासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनच्या रेल्वे स्टेशन मास्टरांनी देशव्यापी संप पुकारला असून ३१ मे रोजी सामुहिक रजेवर जाण्याची नोटीस प्रशासनाला दिली आहे.

रेल्वे प्रशासनात रेल्वे स्टेशन मास्टरांची कमतरता असल्याने रेल्वे स्थानकावर नियुक्त असलेल्या स्टेशन मास्टरांना अनेक अडचणीना सामोरे जावे लागत आहे.   देशभरातील सहा हजारांहून अधिक स्टेशन मास्टर्सची कमतरता असून सध्यस्थितीत देशभरातील सर्वच रेल्वे स्थानकावर मान्यतेपेक्षा कमी संख्येने स्टेशन मास्टर कार्यरत आहेत.  रेल्वे प्रशासनाकडून या पदावर भरती देखील करण्यात येत नाही.

देशभरात निम्मेपेक्षा अधिक रेल्वे स्थानकांवर सध्या केवळ दोनच स्टेशन मास्टर नियुक्त आहेत. स्टेशन मास्टरांची कामाची शिफ्ट आठ तासांची असली तरी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे दररोज १२-१२ तासांमध्ये काम करावे लागते. सुटी असेल त्यादिवशी कर्मचाऱ्याला दुसऱ्या स्थानकावरून बोलावाले लागते. आणि अशा परिस्थितीत कोणत्याही कर्मचार्‍यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्यांच्या घरात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर कामावर परिणाम होतो. यासंदर्भात अधिकारी रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, कंत्राटीकरण बंद करा, यासह अन्य मागण्यासाठी ऑल इंडिया स्टेशन मास्टर्स असोसिएशनतर्फे ३१ मे रोजी देशव्यापी सामुहिक रजेवर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

३१ मे रोजी स्टेशन मास्टर्सच्या सामुहिक रजेवर जाण्यासंदर्भात कोणत्याहि सूचना आलेल्या नाहीत असे भुसावळ मध्य रेल्वे विभागाच्या प्रशासन सूत्रांनी म्हटले आहे.

 

Protected Content