सुभाष चौकात तरूणाला दोघांकडून बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सुभाष चौकात एका महिलेच्या भाजीपालाच्या पिशवीला पायाचा धक्का लागल्याच्या कारणावरून दोन जणांनी एका तरूणाला बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शुक्रवार २१ मे रोजी दुपारी शनीपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, निलेश मुकुंदा कासार (वय-३८) रा. रथ चौक, जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरूवार १९ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शहरातील सुभाष चौकात ते दुचाकीने आले होते. दरम्यान, दुचाकीवरून उतरत असतांना त्यांचा पाय एका महिलेच्या भाजीपाल्याच्या पिशवीला लागला. या कारणावरून शोऐब शह लसूनवाला आणि सिंकंदर लंगड्या ऑटोवाला (पुर्ण नाव माहित नाही) यांनी दुचाकीवरील तरूणाला बेदम मारहाण करून जखमी आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. निलेश कासार यांने शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून शुक्रवार २० मे रोजी दुपारी शनीपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

 

Protected Content