कॅरीबॅग वापरणाऱ्यांना मनपा लावणार चाप : कारवाई होणार (व्हिडिओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कॅरीबॅग वापराबाबत शहरातील व्यावसायिकांमध्ये जनजागृती व्हावी व त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत महापालिका हद्दीत सिंगल युज कॅरीबॅग वापरकर्त्यांवर सोमवारपासून दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आयुक्त डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

बैठकीत शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते,व इतर व्यवसाय करणाऱ्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या समस्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या समोर मांडून साधकबाधक चर्चा केली. यावर आयुक्त डॉ. गायकवाड यांनी समर्पक असे उत्तर देत त्यांनी सिंगल युज कॅरीबॅग वापरणे बंद करावे अन्यथा तुमच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. सोमवारपासून शहरात महापालिकेतर्फे शहरात पथके नेमून सिंगल युज कॅरीबॅग वापर करणाऱ्यांवर दंडात्मक करण्यात येईल असा इशारा त्यांनी बैठकीत दिला. तसेच शहरातील तमाम नागरीकांना आवाहन करण्यात येत आहे की यापुढे बाजारात येताना कापडी पिशव्या घेऊन यावे अन्यथा व्यवसाय करणारे तसेच नागरिकांवर सुद्धा अधिनियमान्वये दंडात्मक कारवाई करण्यात येईल . याची नोंद घ्यावी असे प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत असल्याचे कळविण्यात आले आहे.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1088251948701371

 

Protected Content