Home Cities जळगाव तरसोदच्या गणरायाचे दर्शन करून गुलाबराव देवकरांच्या मोर्चेबांधणीस प्रारंभ

तरसोदच्या गणरायाचे दर्शन करून गुलाबराव देवकरांच्या मोर्चेबांधणीस प्रारंभ

0
106

जळगाव प्रतिनिधी । तरसोद येथील गणेश मंदिरात प्रार्थना करून गुलाबराव देवकर यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे.

गुलाबराव देवकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले असून याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, उमेदवारीची निश्‍चिती झाल्यानंतर देवकरांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. मंगळवारी दिवसभर त्यांनी आगामी निवडणुकीबाबत खलबते केली. यानंतर जळगाव तालुक्यातील तरसोद येथील भाविकांना पावणार्‍या गणेश मंदिरात त्यांनी प्रार्थना केली. याप्रसंगी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले, अ‍ॅड. सचिन पाटील, पंकज बोरोले आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound